⁠ 
शनिवार, मे 4, 2024

राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार इशारा ; जळगाव जिल्ह्यात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातील राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. काही जिल्ह्यात पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.

शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट वाढणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु दमदार हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील जलसाठ्यात इंचभरही वाढ झालेली नाहीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज आणि उद्या येलो अलर्ट?
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज बुधवारी आणि उद्या गुरुवारीसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगांव जिल्हा दि,12/ 07/2023
अमळनेर-
बोदवड-12
भडगाव-
भुसावळ-13.8
पाचोरा-5
पारोळा-0
जामनेर-5
चोपडा-31
चाळीसगाव-
रावेर-3
मुक्ताईनगर-16
धरणगाव-5
यावल-36
एरंडोल-4
जळगाव-4