---Advertisement---
जळगाव जिल्हा जामनेर

जामनेरात बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । जामनेर तालुक्यातील कै. वसंतराव नाईक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

GUNVATAVIDHYARTHI

जामनेर येथील पंचायत समिती हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्याचबरोबर चालू वर्षांमध्ये डॉक्टर, इंजिनियर झालेले विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व वृक्षांचे रोप देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला बंजारा समाजाचे संत श्याम चैतन्य महाराज, रमेश नाईक, विठ्ठल जाधव, नितीन नाईक, अमरसिंग राठोड, छत्रसिंग पवार, डॉ. श्याम चव्हाण, इंद्रसिंग जाधव, बन्सीलाल चव्हाण, राजेश नाईक, निलेश चव्हाण, खेमराज नाईक यांच्यासह बंजारा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---