---Advertisement---
जळगाव जिल्हा रावेर

ब्राह्मण हितवर्धिनी समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातील पहिली ते पदवीधर व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा समिती अध्यक्षा माधवी कानडे, उपाध्यक्षा शैला कुळकर्णी, कोषाध्यक्ष दत्तात्रय कानडे, अ‍ॅड.प्रसन्न गचके व उर्मिला शर्मा यांच्याहस्ते गचके दत्त मंदिरात करण्यात आला.

braman

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पालक म्हणून श्रीकांत मटकरी यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी सोहम मटकरी याने आपले मनोगत व्यक्त केले. अभ्यासात सातत्य व कठीण परीश्रम ही यशाची खरी गुरकिल्ली असल्याचं त्याने सांगितले. यशस्वीतेसाठी सुभाष कुलकर्णी, रसीका जोशी, रीतेश सकळकळे, दत्तात्रय कानडे, किरण कुलकर्णी यांनी परीश्रम घेतले. बाबा जोशी यांनी मानले. बहुसंख्येने समाजाचे बंधू-भगिनी उपस्थित होते. एकूण 24 गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---