⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 16, 2024
Home | वाणिज्य | 1 जुलैपासून HDFC चे विलीनीकरण! खातेदार, कर्जदार, FD केलेल्यांवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

1 जुलैपासून HDFC चे विलीनीकरण! खातेदार, कर्जदार, FD केलेल्यांवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । दोन दिवसानंतर म्हणजेच 1 जुलै 2023 पासून एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं विलीनीकरण होणार आहे. या मोठ्या विलीनीकरणानंतरही १ जुलैपासून अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. दरम्यान, यानंतर आता ग्राहकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच्या बँक खात्याचे काय होणार? HDFC गृह कर्जावर काय परिणाम होईल? किंवा दोन्ही कंपन्यांचे शेअर्स कसे विभागले जातील? आज आम्ही अशाच काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत की, या दोन्ही बँकेच्या संबंधित ग्राहकांवरच नव्हे तर या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरही काय परिणाम होईल?

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होईल का?
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणाची तारीख मंगळवारी जाहीर करताना, एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विलीनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या नव्या संस्थेमध्ये दोन्ही कंपन्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारात अजिबात कपात केली जाणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या कामावर काही संकट येऊ शकते का?
कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत अध्यक्ष दीपक पारीख म्हणाले की, ६० वर्षांखालील प्रत्येक कर्मचाऱ्याचा समावेश केला जाईल. एचडीएफसी बँकेला आमच्या लोकांची गरज असेल.

जर माझे एचडीएफसी बँकेत खाते असेल तर त्याचा काय परिणाम होईल?
अजिबात नाही, दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतरही खातेधारकांना सध्या पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधा सुरू राहतील. यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांपासून ते इतर खातेदारांपर्यंत सर्व जुन्या सेवा उपलब्ध राहतील.

जर मी HDFC Ltd कडून गृहकर्ज घेतले असेल तर?
दीपक पारेख म्हणाले की, एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये एचडीएफसी सेवा उपलब्ध असेल. जर तुम्ही एचडीएफसीकडून गृहकर्ज घेतले असेल तर तुम्ही आता एचडीएफसी बँकेचे ग्राहक व्हाल. सध्याच्या गृहकर्जाच्या अटी व शर्तींनुसार कर्जदार त्याचे EMI भरणे सुरू ठेवेल.

याशिवाय, एचडीएफसी बँक एफडीधारकांना पूर्वीप्रमाणेच सुविधा देईल, असे सांगितले जात आहे, परंतु या प्रकरणात काही बदल देखील दिसू शकतात. वास्तविक, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन्हींच्या व्याजदरांमध्ये फरक आहे. जेथे बँक कमी व्याज देत आहे, तेथे गृहनिर्माण वित्त कंपनी ग्राहकांना अधिक व्याज देत आहे. HDFC 12 ते 120 महिन्यांच्या FD वर 6.56% ते 7.21% व्याज देते, तर बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% -7.25% व्याज देते. मात्र, यासंदर्भातील चित्र विलिनीकरणानंतर स्पष्ट होणार आहे.

माझ्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास काय?
महत्त्वाची बाब म्हणजे, एचडीएफसी हाउसिंग फायनान्स आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण हे कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण आहे. यानंतर, HDFC ची एकत्रित मालमत्ता 18 लाख कोटींहून अधिक होईल. व्यवस्थापनाने सर्व सेवा सुरळीत राहतील असे आश्वासन दिल्याने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कोणताही बदल होण्याची शक्यता कमी दिसते.

HDFC बँक खाते क्रमांक आणि चेकबुकमधील बदल दिसतील का?
उत्तर- सांगितल्याप्रमाणे, विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांना पूर्वीप्रमाणेच सुविधा मिळत राहण्यास सांगितले आहे, याचा अर्थ खात्याशी संबंधित कोणताही बदल होणार नाही. अशा परिस्थितीत, चेकबुकमध्ये बदल होण्याची आशा कमी आहे, तथापि, या संदर्भात बँकेकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकदारांचे काय होईल?
उत्तर- एचडीएफसी बँक-एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांबद्दल बोलायचे झाले तर, या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेतील 100 टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे असेल आणि एचडीएफसीचे विद्यमान भागधारक बँकेत 41 टक्के हिस्सेदारी ठेवतील. HDFC लिमिटेडच्या प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

13 जुलैपासून स्टॉक डिलिस्टिंग होईल
एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले की, विलीनीकरणाला मंजुरी देण्यासाठी ३० जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या बोर्डांची बैठक होईल. समूहाचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांच्या मते, HDFC स्टॉक डिलिस्टिंग 13 जुलै 2023 पासून प्रभावी होईल. याचा अर्थ 13 जुलै रोजी समूहाच्या हाऊसिंग फायनान्स फर्मचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून डिलिस्ट केले जातील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.