जळगाव जिल्हाजळगाव शहर
शहर भाजपात मेगा भरती ; गिरिश महाजन यांच्या उपस्थित प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज | ७ एप्रिल २०२२ | भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने जुन्या जळगावातील वीर जवान गृप चे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या सोबत तब्बल ५० तरुण कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी हा पक्ष प्रवेश घडवून आणला. जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते नी जय श्री राम, वंदे मातरम्,, भारतीय जनता पार्टी ,घोषणा देऊन प्रवेश केला या प्रसंगी अरविंद देशमुख ,युवा मोर्चा चे जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी , भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते