⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Eknath Shinde Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यात बैठक सुरु

Eknath Shinde Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यात बैठक सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधानपरिषद निवडणूक आटोपताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) यांच्यासह २५ आमदार आणि ५ मंत्री फुटल्याचा बातम्या समोर येत आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील फुटल्याचे वृत्त समोर येत असले तरी अद्याप तरी ते खोटे आहे. जळगाव लाईव्ह न्यूजने गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ShivSena) यांच्याशी संपर्क केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रचंड आक्रमक झाली असून साम, दाम, दंड, भेद काहीही करून महाराष्ट्रात भाजपला आपले सरकार प्रस्थापित करायचे आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला होता. विधान परिषद निवडणुकीत देखील भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा झटका दिला आहे. बहुमत नसताना देखील पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते मिळावीत भाजपने प्रसाद लाड यांना निवडून आणले आहे.

एकीकडे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका बसला असताना भाजपने पुन्हा त्यांची झोप उडवली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदारांचा एक मोठा गट नॉट रिचेबल झाला असून सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री आणि काही आमदार देखील फुटल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर दाखविले जात आहे. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत सर्वच आमदारांशी संपर्क साधला.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सर्वांच्या संपर्कात असून ते नॉट रिचेबल देखील नाहीत. जळगाव लाईव्ह न्यूजने गुलाबराव पाटलांशी संपर्क केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे देखील न्यायालयीन कामानिमित्त दिल्ली येथे गेलेल्या असल्याची माहिती त्यांचे पती माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे. सध्या अनेक अफवा पसरविल्या जात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.