जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव व धुळे जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांची येथील मंगळग्रह मंदिरात बुधवार, १० ऑगस्ट २०२२ रोजी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सदगुरू नंदकुमार जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. एन. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगडचे संघटक सुनील घनवट व पद्मालय देवस्थान एरंडोलचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते मंगळग्रहाच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मंदिर विश्वस्ताच्या बैठकीचा उद्देश जळगावचे हिंदू जनजागृती समितीचे जळगाव विभागाचे प्रमुख प्रशांत जुवेकर यांनी मांडला. त्यानंतर देश-विदेशातील हिंदू मंदिराची सद्यःस्थिती आणि मंदिरापुढील आव्हाने यांसदर्भातील माहितीपट दाखविण्यात आला. मंदिर सुव्यवस्थापन व मंगळग्रह मंदिराने आजवर केलेले धार्मिक संस्कृती रक्षणाचे प्रयत्न यासंदर्भात दिलीप बहिरम यांनी मार्गदर्शन केले. मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे का आवश्यक आहे, याविषयी सदगुरू नंदकुमार जाधव यांनी भूमिका विशद केली. सुनील घनवट यांनी मंदिर संस्कृतीची पंचसूत्री विशद केली. तर डॉ. पांडुरंग पिंगळे यांनी मंदिर म्हणजे पर्यटनाचे क्षेत्र नव्हे, तर ते चैतन्याचे स्त्रोत असल्याचे सांगितले. याचवेळी विविध ठिकाणच्या मंदिर विश्वस्तांनीही आपापली मते व्यक्त केली.
यावेळी शनी मंदिर जळगावचे विश्वस्त गोविंद जोशी, पुजारी सचिन जोशी, राम मंदिर पारोळाचे विश्वस्त दत्तात्रय महाजन, दत्त मंदिर जळगावचे पुजारी शिवकुमार जोशी, बालाजी संस्थान पारोळाचे विश्वस्त प्रकाश शिंपी, दिनेश गुजराथी, पद्मालय देवस्थान एरंडोलचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे, अमृत कोळी, अशोक पाटील, राजेश तिवारी, भिका महाजन, हिशेबनीस महेंद्र जोशी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बोरनारचे विश्वस्त सुरेश जैन, सचिव गोकुळ देशमुख, कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट नीम (ता. अमळनेर) येथील खजिनदार छोटू पाटील, जय मायक्कादेवी संस्थान जळगावचे विश्वस्त मोहन तिवारी, एकविरा व रेणुकामाता मंदिर ट्रस्ट देवपूर-धुळेचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, विश्वस्त संजय गुरव, बाळकृष्ण गुरव, सचिव नंदलाल सोनवणे, श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेरचे अध्यक्ष सुभाष चौधरी, पुरोहित विनीत जोशी, लोटन पाटील, श्री. कोठारी, सनातन साधक रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. रागेश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
मंदिर विश्वस्तांनी मांडलेले ठराव
- मंदिरात वस्रसंहिता असावी.
- मंदिरांनी धार्मिक संस्कृती रक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक व मंदिर हे धर्मशिक्षणाचे केंद्र बनावे.
- मंदिर संस्कृती रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे.
- महाराष्ट्रातील सर्व मठ, मंदिरे, देवस्थाने सरकारमुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात दिली जावीत.
- मंदिराच्या ५०० मीटर परिसरात मांस व मद्य याच्या विक्रीची दुकाने नसावीत