⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

रस्त्यांच्या कामाला महापौरांची ‘सरप्राईज व्हिजीट’, गुणवत्तेची केली पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी अचानक भेट रेल्वे स्थानक ते नेहरू चौक रस्त्याची पाहणी केली. यावेळी मनपा अभियंत्यांना सोबत घेत महापौरांनी रस्त्याची गुणवत्ता देखील तपासली.

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांची कामे करताना गुणवत्ता राखा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या आहे. नेहरू चौक ते रेल्वे स्थानक रस्त्याचे काम सुरु असून बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी अचानक भेट देत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. प्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मक्तेदार प्रतिनिधी अभिषेक पाटील, मनपा शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाची पाहणी करताना स्केलद्वारे मोजमाप करीत महापौर जयश्री महाजन यांनी कामाची गुणवत्ता तपासली. कामाचे थर्ड पार्टी ऑडिट केले आहे कि नाही याबाबत देखील महापौरांनी माहिती घेतली. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. शहरातील कोणत्याही नागरिकांची तक्रार येता कामा नये असे देखील महापौरांनी मक्तेदाराला सांगितले.

पहा रस्त्याच्या कामाच्या पाहणीचा व्हिडीओ :