जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । देशाचे रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आज शहरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी दुपारी ना.गडकरी यांचे जळगाव विमानतळावर आगमन होताच महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
महामार्गाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनसाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात आले आहेत. दुपारी ४.३० च्या सुमारास ना.गडकरी यांचे जळगावात आगमन झाल्यावर महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी माजी मंत्री आ.गिरीश महाजन, माजी आ.स्मिता वाघ, खा.उन्मेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.