⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

महापौर जयश्री महाजनांमुळे जळगाव तालुक्यातील ५८ शेतकऱ्यांना मिळाले हक्काचे कोट्यवधी रुपये !

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । २००६ साली जळगाव तालुक्यात शेळगाव बॅरेज उभारण्यात आले होते. त्यावेळी शेळगाव गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले होते. मात्र इतके वर्ष उलटूनही शेळगाव येथील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. अखेर या शेतकऱ्यांनी महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या मध्यस्थीने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.

विस्तारीत माहीती अशी की, जमिनींचे भूसंपादन होऊनही पैसे न मिळाल्याने २००६ साली शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. न्यायालयाने 2019 साली शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला.जिराईत शेतीला प्रति हेक्टर ३ लाख ५० हजार तर पोटखराब शेतीला १ लाख ७५ हजार इतका मोबदला द्यावा असे आदेश दिले. याचबरोबर जर वर्षभरात हे पैसे देण्यात आले नाहीत तर १२ टक्के ज्यादा व्याजाने हे पैसे देण्यात यावेत असेही आदेशात नमूद होते. याच बरोबर दरवर्षी १५ टक्के वाढ मिळावी आदेशात नमूद होते.

तरीदेखील 2023 पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. 2022 साली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र लिहिले होते. मात्र त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे येऊन दाद मागितली. महापौर जयश्री महाजन यांनी आज शेतकऱ्यांसोबत तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वाय.भदाणे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना कशाप्रकारे त्रास होत आहे. कशाप्रकारे त्यांची हानी होत आहे. याबाबत चर्चा करत शेतकऱ्यांची बाजू मांडली.

चर्चेअंती येत्या दोन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील असे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी महापौरांना दिले. आता महापौरांनी केलेल्या मध्यस्थीमुळे 58 शेतकऱ्यांना १० कोटी रुपये मिळणार आहेत. बैठकीवेळी तुम्ही १ कोटी ४५ हजार रुपये घेऊन जा, आम्ही इतर पुढच्या वेळेस देऊ .असे आश्वासनही शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी सर्व रक्कम एकत्रित देण्याचे सांगितले.

आणि जोपर्यंत ही रक्कम मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्या जमिनीवर शेती करता येणार आहे. याचबरोबर जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत बॅरेजचे दरवाजे बंद करण्यात येणार नाहीत असेही सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचा प्रमुख मागण्या
आम्हाला आमच्या जमिनी परत द्या किंवा

आम्हाला त्या जगी शेती करू द्या किंवा

आम्हाला आमच्या जमिनींचा मोबदला द्या.