---Advertisement---
मुक्ताईनगर

मौजे नांदवेल व चिंचखेडा बु. येथ बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नांदवेल व चिंचखेडा बु.येथील शेतीशिवारात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचा अधिवास सिद्ध झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

bibtya jpg webp webp

गेल्या आठवड्यात शेती हद्दीत बिबट्याच्या पाऊलखुणा आढळुन आल्या होत्या तसेच काहींनी बिबट्याला पाहीले होते.दरम्यान महिनाभरापुर्वी चिंचखेडा येथील पशुधनावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याचीही घटना घडली होती. नांदवेल-चिंचखेडा बु शिवारातील पुर्णा नदीकाठालगतच्या शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास आहे. गावात याबाबत चर्चा झाल्याने नांदवेल येथील सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर,गजानन पाटील यांनी वनविभागाला कळविले.

---Advertisement---

दरम्यान वनविभागाकडुन शेतीरस्त्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.बिबट्याची छबी कॅमेऱ्यात ट्रॅप झाली. केळीबागा तसेच मका पीकात रानडुक्करांच्या तसेच अन्य भक्ष्यांच्या शोधात बिबट्या फिरत आहे.मात्र शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण असुन शेतात काम करण्यास धजावत नसल्याने शेतकरी वर्गांची चिंता वाढली आहे.शेतात काम करीत असतांना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---