जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । 14 वर्षात एकच गोष्ट ज्याने तुमचा खिसा हलका झाला नाही! ती स्वतः महागाईच्या ओझ्याखाली थोडी ‘हलकी’ झाली, पण तिच्या किंमती वाढल्या नाहीत. पण आता 14 वर्षांनंतर माचिसच्या किमती वाढणार आहेत. माचिस तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रपणे हा निर्णय घेतला असून आता १ रुपयाच्या माचिससाठी २ रुपये मोजावे लागतील.
एकीकडे देशभरात पेट्रोल-डिझेल, गॅस, खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत भाव गगनाला भिडले असता त्यामध्ये आता माचिसच्या दरवाढीचा भर पडला आहे. जवळपास 14 वर्षांनी माचिसचा दर वाढणार आहे. अलीकडच्या काळात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. काडीपेटी तयार करण्यासाठी 14 वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे.
यापूर्वी 2007 मध्ये काडीपेटीच्या दरात बदल झाला होता. त्यावेळी त्याची किंमत 50 पैशांनी वाढवून 1 रुपये करण्यात आली होती. आता नवीन दर 1 डिसेंबरपासून लागू होईल. जवळपास 14 वर्षांनी माचिसचा दर वाढणार आहे. ही माचिस थोडीथोडकी नव्हे दुप्पट दराने वाढणार आहे. 1 डिसेंबरपासून ही माचिस 1 रुपयांऐवजी आता दोन रुपयांना मिळणार आहे.
दर दुप्पट का होणार?
रेड फॉस्फरसचा दर 425 रुपयांवरून 810 रुपयांवर पोहोचला आहे. मेणाची किंमत 58 रुपयांवरून 80 रुपये झाली आहे. आऊटर बॉक्स बोर्डची किंमत 36 रुपयांवरून 55 रुपये झाली आहे. इनर बॉक्स बोर्डची किंमत 32 रुपयांवरून 58 रुपये झाली आहे. याशिवाय कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फर सारख्या पदार्थांच्या किमतीतही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्पादक सध्या 600 मॅचबॉक्सचे बंडल 270-300 रुपयांना विकत आहेत. एका काडीपेटीत 50 काड्या असतात. आम्ही किंमत 60 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही 430-480 रुपये प्रति बंडल दराने सामान विकू. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्चाचा समावेश नसेल, असे उत्पादकांकडून स्पष्ट करण्यात आले.