---Advertisement---
कोरोना महाराष्ट्र

मोठी बातमी ! महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती, या ठिकाणी मास्क बंधनकारक?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्रात मास्कमुक्ती मिळाली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. याबाबत आरोग्य सचिवांलयाकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

mask

कुठे-कुठे मास्क बंधनकारक?
राज्यात मागील दोन महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. गेल्या दोन महिन्यात करोना रुग्णसंख्या जेमेतम १०० चा टप्पा पार करत होती. मात्र मागील काही दिवसापासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढत्या बाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्स बैठक घेऊन आढावा घेतला. दरम्यान, आता बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

---Advertisement---

आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात बंदीस्त जागेत जिथं मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात, तिथं मास्क घालणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---