---Advertisement---
भडगाव

विवाहिता १० वर्षीय मुलीसह बेपत्ता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । भडगाव तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी असलेली महिला आपल्या मुलीसह नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, याबाबत पोलीसात तक्रारीची माहिती मिळू शकली नाही.

jalgaon 47 jpg webp

रुपाली भागवत पाटील (वय ३२) कन्या रितिकाला (वय १०) असे बेपत्ता झालेल्या माय लेकींचे नाव आहे. तांदुळवाडी येथील शेतकरी भागवत मधुकर पाटील यांच्या पत्नी रुपाली (वय ३२) व कन्या रितिकाला (वय १०) या दोघी माय लेकी दि. ८ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे थायरॉईडच्या टेस्टसाठी चाळीसगाव येथील शैलेश हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांनी नाव नोंदणी केली. नोंदणी क्र. ८० असल्याने मुलीला नाश्ता व पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या, त्या वेळेत आई व मुलगी बेपत्ता झाल्या.

---Advertisement---

त्यांचा फोन बंद येत असल्याने भागवत पाटील हे तांदुळवाडी फाट्याजवळ दुपारी ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत पत्नी व मुलीची वाट पाहत बसले. नातेवाईकांना देखील फोन करून त्यांनी विचारपूस केली. मात्र, मायलेकी आढळून आल्या नाहीत. जवळचे नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांनी शोध घेणे चालू ठेवले. तीन दिवस झाल्याने त्यांचा तपास लागत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत. पोलीसात तक्रारीची माहिती मिळू शकली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---