बाजार समिती निवडणुक : 512 व्यापाऱ्यांना दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे
त्यामुळे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आता सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव बाजार समितीसाठी २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांवर शशिकांत बियाणी व नितीन बेहळे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या बाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती.
त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी ५१२ मते रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात नितीन चांडक व इतर पाच जणांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.