गोपी गोल्ड इंग्लिश स्कूल मध्ये मराठी दिन साजरा, चिमुकल्यांचा जल्लोष!
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथील ग्रामीण उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक मराठी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, या प्रार्थनेचे करण्यात आली. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा परिधान करून अतिशय सुंदर असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मराठी’च्या पाठ्यपुस्तकावर आधारित इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी कविता तालासुरात सादर केले. कुमारी, दीप्ती पाटील, स्वरा पगार, स्नेहल महाजन, केवल वालडे यांनी राजभाषा दिवस याबद्दल माहिती सांगितली. तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती वडगावकर यांनी प्रास्ताविक करून राजभाषा मराठी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त त्याच्या साहित्य संपदे विषयी माहिती दिली. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते व संस्थेचे अध्यक्ष सचिन भाऊ विसपुते यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मराठी राजभाषा विषयी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन आशा पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली तेलंगे यांनी केले. आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपी गोल्ड स्कूलच्या सहशिक्षिका हिना सय्यद, कविता सुर्वे, सुवर्णा बाळापुरे, अश्विनी महाजन, गौरी सोनार, ममता सुतार, नयना बडगुजर यांचे सहकार्य लाभले.