जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । रेल्वेने भुसावळहुन भोपाळकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर जाण्याआधी कोणकोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत हे माहिती असणे गरजेचं आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे :
क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी
रद्द. क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर-
हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅट एक्स्प्रेस
– क्र. ०१४३१ पुणे-गोरखपूर आणि क्र. ०१४३२ गोरखपूर-पुणे विशेष गाडी डिसेंबरपर्यंत पर्यंत रद्द असेल,
– क्र. ०१०२५ दादर-बलिया ६ ते ८ डिसेंबर दरम्यान तर क्र. ०१०२६ बालिया-दादर ही गाडी ८ ते १० डिसेंबर यादरम्यान रद्द राहिल. क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ७ डिसेंबर तर क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर ही गाडी ९ डिसेंबर रोजी रद्द.
क्र. १७०२० हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेस २ डिसेंबर तर क्र. १७०१९ हिस्सार-हैदराबाद एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी रद्द असेल, क्र. १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ७ व ८ डिसेंबर रोजी तर क्र. १५०६६ पनवेल-गो- रखपूर एक्स्प्रेस ८ व ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.
– क्र. ०१९२२ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-पुणे एक्स्प्रेस ६ आणि क्रमांक- ०१९२१ पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झांसी एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजीची रद्द असेल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.
८ रोजी रद्द तर क्र. १२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.
क्र. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस आणि क्र. १९४८४ बरौनी-
अहमदाबाद एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर त ९ डिसेंबरपर्यंत रद्द. क्र. १९४३७ अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत त- क्र. १९४३६ आसनसोल-अहमदाबाट एक्स्प्रेस २ डिसेंबरपर्यंत रद्द.