बहिणाबाई उद्यानात अनेक बगळे अचानक मृत्यमुखी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । शहरातील बहिणाबाई उद्यानात सुमारे ३० पक्षी झाडावरून पडून मृत्यू झाले आहे. ही माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकांना मिळाली. पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले असता सुमारे ३० बगळे मृत्यू व १० ते १२ बगळे जगण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. दरम्यान, डॉक्टरांनी पक्षांबाबत महिती घेतली व पक्षांचे निरीक्षण केले असता सर्वच पक्षांचे पाय अधू झाल्याचे दिसून आले. यावरून पक्षी झाडांवरील घरट्यातुन पडल्याचे निष्कर्ष कढण्यात आला.
शहरातील बहिणाबाई उद्यानात बगळे झाडावरून पडून मरत असल्याची माहिती गणेश सुरसे यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या बाळकृष्ण देवरे यांना कळविली. त्यांनी सदर बाब संस्थेच्या कंट्रोल रूम या गृप वर पोस्ट केली. मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, योगेश गालफाडे, हेमराज सोनवणे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सुमारे 30 पक्षी बगिच्यात वेगवेगळ्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेले दिसून आले तर 10-12 बगळे जगण्याची धडपड करत असल्याचे दिसून आले. अध्यक्ष रवींद्र फालक यांनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या पक्षाना पाणी पाजून वनविभागास कळविले.
पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधला, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश चोपडे आणि मनीष बाविस्कर यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत मेलेल्या पक्षांबाबत महिती घेतली. डॉक्टरांनी पक्षांचे निरीक्षण केले असता सर्वच पक्षांचे पाय अधू झाल्याचे दिसून आले या वरून पक्षी झाडांवरील घरट्यातुन पडल्याचे निष्कर्ष कढण्यात आला. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास कौतिक थोरात वनपरिक्षेत्र जळगाव, संदीप नामदेव पाटील, दीपक जगदीश पाटील, वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र रवींद्र फालक, हेमराज सोनवणे, योगेश गाल्फाडे आणि मनपा अभियंता योगेश वाणी यांनी झाडांचे आणि घरट्यांचे निरीक्षण केले. दरम्यान, प्रत्येक झाडावर कमी जागेत असंख्य घरटी बांधल्याचे दिसले, म्हणजे जितकी जागा पिलांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यापेक्षा निम्मी जागा एका घरट्याला मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक पिलांच्या वाढी नंतर ते जगण्याचा संघर्ष करत असताना खाली पडून मरत आहेत असे दिसून आले.
परिसरातून माहिती घेतली असता दर पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात असे पक्षी मरत असतात असे समजले. हाच प्रकार श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात देखील घडत असतो अशी माहिती मिळाली. अचानक होत असलेल्या वातावरण बदलामुळे तसेच या काळात पक्षांवर विविध प्रकारचे परजीवी, व्हायरस संक्रमण करतात. त्यांना आजार जडतात त्यामुळे देखील असे पक्षी दगावतात, परंतु हे सगळे पक्षी जुवेनाईल आहेत आणि ते घरट्यातून उंचावरून पडून मेले आहेत असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सांगितले.
दरम्यान, जे पिले खाली पडतात त्यांना त्यांचे पालक खाद्य देत नाहीत. अश्या पिलांना विशिष्ट खाद्य द्यावे लागते ते खाद्य संस्थेचे अमन गुजर यांनी उपलब्ध करून दिले आहे. पक्षांना पाण्या साठी उंच मनोरे निर्माण करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन देणार आहोत असे योगेश गालफाडे यांनी कळविले आहे. व यांना पक्ष्यांचे खाद्य मागवून खाण्याची व्यवस्था केलेली आहे
पावसाळ्याच्या सुरवातीला बगळ्यांचा विणीचा हंगाम असतो या दरम्यान माद्या अंडी घालतात आणि साधारण दिवाळी पर्यंत हे पक्षी मोठे होऊन उडून जातात जळगांव शहरात प्रामुख्याने मेहरुण, बहिणाबाई उद्यान, शामा प्रसाद मुखर्जी उद्यान हे त्यांचे आश्रय स्थान आहे काव्य रत्नावली चौकात वसाहत होत्या त्या आता कमी झाल्या आहेत बगळे हे आपले जीवन समूहाने व्यतीत करतात लहान घरट्यात दोन पेक्षा जास्त पिले राहू शकत नाहीत परिणामी कमजोर पिलाला तंदुरुस्त पिलांकडून खाली ढकलून दिले जाते, किंवा ते पडते. सततच्या वृक्षतोडी मुळे पक्षांचे आश्रयस्थान कमी झाल्याने दाटी वाटीत घरटी करण्याशिवाय या पक्षांकडे पर्याय नसल्याने या घटना वाढत आहेत. – बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था