जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । शहरातून जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्गवर मानराज पार्क (बेंडाळे स्टाॅप) येथे तात्काळ गतिरोधक टाकावे व क्राॅसींग पट्टे करावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व जळगांव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना दिले आहे.

आपल्या निवेदनात राहुल सुरेश पाटील यांनी नमूद केले आहे की, गुजराल पेट्रोल पंप व खोटेनगर येथून येणारे वाहने व तसेच शिवकाॅलनी पुलाकडून येणारे वाहने अतिशय वेगाने येतात व पुढे मानराज पार्क (बेंडाळे स्टाॅप) हा वर्दळीचा परिसर असून नेहमी तिथे नागरिक रोड क्रॉस करीत असतात. याच परिसरात सुपर शाॅप, भाजीपाला बाजार, क्लासेस, विद्यालय असल्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थी सुद्धा सदरील परिसरात मोठ्या प्रमाणात वावरत असतात.
नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरून येणाऱ्या भरधाव अवजड वाहनांपासून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता किंवा जीवितहानी होऊ शकते. सदरील वरील विषयांचा गांभीर्यपूर्ण विचार करून मानराज पार्क (बेंडाळे स्टाॅप) जवळ लवकरात लवकर गतिरोधक व क्राॅसींग पट्टे करून मिळावे. जेणेकरून पुढील होणारे अपघात किंवा जीवित आणि टाळता येईल अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हे देखील वाचा :
- ठरलं तर ! ‘या’ तारखेपासून धावणार जळगाव शहरात ई-बस; असे निश्चित झाले मार्ग?
- जळगाव हादरले ! ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
- जळगाव शहरातील हॉटेलमध्ये आढळला पुण्यातील वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
- Jalgaon : ४० ते ५० प्रवासी असलेल्या बसला ट्रॅकने कट मारला अन्.. सुदैवाने मोठा अनर्थ टळला
- देशातील पहिली ‘अमृत भारत रेल्वे’ जळगाव, भुसावळ मार्गे धावली, असा आहे रूट?