Jalgaon : ४० ते ५० प्रवासी असलेल्या बसला ट्रॅकने कट मारला अन्.. सुदैवाने मोठा अनर्थ टळला

एप्रिल 28, 2025 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । जळगावमध्ये अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच अंगावर शहारा आणणारी एक घटना घडली. ज्यात भरधाव ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी भरलेली एसटी बस खड्ड्यात गेली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला. हा अपघात जळगावमधील आहुजा नगर ते द्वारका नगर या थांब्यादरम्यान घडला. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून शोध घेतला जातोय.

JL St 1

नेमकी घटना काय?
निंभोरेहून जळगावला येणारी एसटी बस आहुजा नगर स्टॉपजवळ आली होती. याचदरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्यामुळे एसटी चालकाचा संयम सुटला आणि बस समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली. सुदैवाने बस झाडाझुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला. कारण, बस ज्या खड्यावर अडकली तो खड्डा मोठा होता. प्रवाशांचे दैव बलवत्तर होतं म्हणून दुर्घटना टळली.

बसमध्ये जवळपास ४० ते ५० प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत झाली नाही.या अपघातानंतर मात्र ट्रॅक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून शोध घेतला जातोय.प्रवाशांचा थरकाप उडवणारी ही घटना होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment