---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा राजकारण

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी पुन्हा मंदाकिनी खडसे विराजमान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । येथील जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी पुन्हा आपला अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या.

mandakini khadase

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे दिनांक १३ जुलै २०२१ पासून दि.१७ जानेवारी २०२२ पर्यंत दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या. त्यांनी दि.१८ जानेवारी रोजी संघाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला असून, कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे. मधल्या काळात ईडी चौकशीकामी त्यांना मुंबई येथे देखील जावे लागले होते. मंदाकिनी खडसे या रजेवर असल्याने दूध संघाचा पदभार माजी खा.वसंतराव मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---