जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । सेवाकार्याचा कुंभमेळा म्हणजेच ‘मल्हार हेल्प फेअर -४’ येत्या १२ ते १४ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित होत आहे. यावर्षी प्रथमच आपल्या समाजाला योगदान देणाऱ्या सेवदूतांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यासाठी विजेत्यांची नवे घोषित करण्यात आली आहेत.
विविध समाजांमध्ये जन्मसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने कार्यरत असतात. यावर्षी मल्हार हेल्प फेअरने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान या सेवदूतांवर छोटीशी चित्रफीत देखील दाखवण्यात येणार असून यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा कशी मिळाली व त्यातून मिळणारा आनंद याविषयी ते बोलणार आहेत.
पुरस्कारासाठी यांची निवड
अजय कमळस्कर, अल्ताफ शेख, अनिल अत्रे, दमितसिंह ग्रोवर, दर्शन सुरतवाला, दीपक परदेशी, किशोर सूर्यवंशी, मुरलीधर लुले, मुश्ताक सालार, नामदेव वंजारी, पुष्पा भंडारी, रतन बारी, साधुराम कालवानी, संग्रामसिंह सूर्यवंशी, ललिता व डॉ. सुरेश अग्रवाल, प्रमोद झंवर, राजेश वारके, स्व. मैठीदेवी तलरेजा, दिव्या भोसले.
वरील सेवदूतांना दिनांक १२ व १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.