जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | संपूर्ण भारतामध्ये कित्येक नागरिकांना विस्मृतीचा त्रास आहे मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष करणे अतिशय चुकीचे आहे मात्र विस्मृती फक्त आपल्या आहारामध्ये बदल केल्यास घालवली जाऊ शकते. त्यामुळे विसर्जन त्रास सहजरीत्या कमी करता येऊ शकतो. आपण लहान सहान गोष्टी विसरतो. या विसरभोळेपणामुळे नुकसान होतो त्यामधून आपल्याला स्वतःवरच राग येतो. विस्मृती हे तुम्हांला सुरुवातीला लहान वाटत असले तरीही अल्झायमरची सुरुवात असू शकते. आहारात बदल केल्यास तुमचा विस्मृतीचा त्रास कमी करता येऊ शकतो.
आहारात कोणत्या पदार्थांचा कराल समावेश ?
टोमॅटो टोमॅटोमध्ये अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमित त्याचा सलाडमध्ये समावेश केल्यास स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. सोबतच स्मरणशक्तीदेखील सुधारते. किसमिस मनुका म्हणजेच किशमिशीमध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. यामुळे मेंदूचं आरोग्य जपायला मदत होते. याकरिता नियमित सकाळी १५-२० किसमिस पाण्यात भिजवून खावेत. यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. हृदयाचे कार्य सुधारते.
ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑईलचा आहरात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. चपात्यांवर साजूक तुपाला हा एक हेल्दी पर्याय आहे. यामुळे मेंदूचं आरोग्य जपायला मदत होते. आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आहारात अधिक प्रमाणात मीठ, साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूडचा आहारात समावेश केल्याने मेंदूच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.