⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | नशिराबादच्या विकासासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

नशिराबादच्या विकासासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । नशिराबादच्या विकासाला आपण आधीच प्राधान्य दिलेले आहे. शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेचा नगराध्यक्ष करा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नशिराबाद येथे शिवसेनेचा पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवासेना आणि शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख संजय सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, संगानियोचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, करीम कल्ले, युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, पंचायत समिती सभापती जनाआप्पा पाटील, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, मुकेश सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, तत्कालीन सरपंच विकास पाटील, उपतालुका प्रमुख दगडू माळी, शहर प्रमुख विकास धनगर, युवासेना तालुका प्रमुख चेतन बर्‍हाटे, चंद्रकांत भोळे, बंडू रत्नपारखी, आप्पा धर्माधिकारी, नितीन बेंडवाल, भूषण कोल्हे, मोहन कोलते, संदीप पाटील, दीपक सपकाळे, ज्ञानेश्‍वर घोळकर, बापू चौधरी, आबा माळी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सर्व गट-तट आणि आप-आपसातील वाद विसरून सर्व एकत्र आले हा शुभशकून आहे. आपण कुणावर टिकाटिपण्णी न करता विकासकामांच्या माध्यमातून विकासाची मोठी रेषा काढणार आहे. शिवसेनेत पक्षनिष्ठेला महत्व दिले जाते. जाती-पातीपेक्षा कर्तव्यदक्ष उमेदवारांना आमचे प्राधान्य असते. शिवसेनेकडे मुस्लीम समुदायाचा कल वाढला असून याचीच प्रचिती या समुदायातील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधल्याच्या घटनेतून दिसून येत आल्याचे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, कुणाकडे किती ताकद आहे, यापेक्षा त्याचा वापर कसा होतो हे महत्वाचे असते, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून नगरपरिषदेवर भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.

भव्य मिरवणूकीने स्वागत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नशिराबाद शहरात आगमन होताच प्रचंड आतषबाजी व गगनभेदी घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रास्ताविकात बोलतांना तत्कालीन सरपंच विकास पाटील यांनी नशिराबाद येथे सुरु झालेल्या विकासकामांबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले व भविष्यातही शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या भाषणातून लक्षावधी शिवसैनिकांशी थेट संपर्क असणारे नेते गुलाबराव पाटील हे असल्याचे नमूद करून नशिराबाद नगरपंचायतीवर भगवा डौलाने फडकणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या मनोगतांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नमूद केले.

शिवसेना, युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन
यावेळी शिवसेना आणि युवासेना शाखांचे उद्घाटन आणि फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुस्लीम समुदायातील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांचे पालकमंत्री आणि मान्यवरांनी स्वागत केले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि नशिराबादचे तत्कालीन सरपंच विकास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यकारणी जाहीर
नशिराबादमध्ये शिवसेनेच्या ३ तर युवासेनेच्या ७ शाखांचे उदघाटन आणि फलक अनावरण करण्यात आले. यात भवानीनगर शाखाप्रमुखपदी प्रदीप नाथ व उपशाखा प्रमुखपदी प्रफुल्ल पाटील, वरची आळी शाखा प्रमुखपदी रवींद्र पाटील व उप शाखा प्रमुखपदी संतोष पवार, बस स्थानक परिसर शाखा प्रमुखपदी हर्षल माळी व उप शाखा प्रमुखपदी शुभम माळी यांची नियुक्ती करण्यात आली तर युवासेना शाखांमध्ये इंदिरा चौक शाखाप्रमुखपदी निलेश धनगर व उपशाखा प्रमुखपदी दीपक गंजम, होळी मैदान शाखा प्रमुखपदी दीपक बोंडे व उपशाखा प्रमुखपदी किरण बर्‍हाटे, भीलवाडी परिसर शाखा प्रमुखपदी किशोर बागले व उपशाखा प्रमुखपदी किरण बागले, सप्तश्रुंगी चौक शाखा प्रमुखपदी गजानन पाचपांडे व उपशाखा प्रमुखपदी जीवन कोलते, बेळी रोड परिसर शाखाप्रमुखपदी दिनेश माळी व उपशाखा प्रमुखपदी सोपान कोळी, भवानीनगर परिसर शाखा प्रमुखपदी दीपक सपकाळे व उपशाखा प्रमुखपदी मनोज देशमुख, देशप्रेमी चौक शाखा प्रमुखपदी विशाल झोपे व उपशाखा प्रमुखपदी योगेश साळी आदींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर. खंडारे यांनी केले तर आभार युवासेना तालुका युवा अधिकारी चेतन बर्‍हाटे यांनी मानले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.