जळगाव लाईव्ह न्यूज । डॉक्टर झालो म्हणजे पैसे देणारे झाड गवसले असे नसते तर वैद्यकिय सेवा देतांना माणुसकी जपणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गोदावरी फॉउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी आज केले.

डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात सन २०१९ च्या बॅचचा दिक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ केतकीताई पाटील या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर एन.एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेश मिश्रा, डॉ पंकज शर्मा, डॉ. आरती शिलाहार आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी देखिल ऑनलाईन उपस्थीती दिली. समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ऑनलाईन पध्दतीने संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी विदयार्थी व पालकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा व्यक्त केल्यात.

ग्रामीण भागात आरोग्य सेवेची गरज- डॉ. केतकी पाटील
सन २०१९ ही बॅच मोठ्या कठीण काळातून गेली आहे. कारण शैक्षणिक वर्षात कोरोनाचे संक्रमण आले. याकाळात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा ताण होता. आता पुढे काय होईल? असा प्रश्न त्यांच्या मनात होता. मात्र पालक आणि विद्यार्थी यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच आज हा समारंभ होत आहे. आज तुम्हाला जरी डिग्री मिळाली असली तरी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे.आज वैद्यकीय पदवी प्राप्त केली असून भविष्यात आणखी संशोधन करा, शहरी भागात जाऊन अनुभव घ्या मात्र ग्रामीण भागात सर्व प्रथम रुग्णसेवा द्या. ग्रामीण भागाशी आपली नाळ जुळवून ठेवा तसेच वैद्यकीय सेवा देतांना माणुसकी जपा असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी केले.
५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या दिक्षांत समारंभात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. आपला पाल्य डॉक्टर झाल्याने अनेक पालकांच्या डोळे आनंदाश्रुंनी डबडबलेले दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजीव जामोदकर प्रशासकिय अधिकारी, ललित महाजन यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रध्दा पाटील व दिपेश सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. पंकज शर्मा यांनी मानले.