जळगाव महापालिकेत महायुती सुसाट.. ‘मविआ’चा सुफडा साफ ; कोणत्या पक्षाला किती जागा?

जानेवारी 16, 2026 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ पैकी ६३ जागांसाठी काल गुरुवारी मतदान झाले. यानंतर आज १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून यामध्ये महायुती सुसाट दिसून आली. जळगाव महापालिकेत महायुतीला प्रचंड प्रतिसाद जळगावकरांनी दिल्याचं मतमोजणीतून दिसून आले असून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.

mahayuti manapa

जळगाव महापालिकाच्या आतापर्यंत हाती आलेले निकालात भाजपचे सर्वात जास्त उमेदवार विजयी झाले. महापालिकेवर महायुतीने झेंडा फडकविला आहे.

Advertisements

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपने ४७, शिवसेना शिंदे गटाने २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पैकी भाजपने ४७ पैकी ४६ जागांवर विजयी आघाडी घेतली असून शिवसेना शिंदे गटाला देखील २३ पैकी २२ जागांवर विजयी आघाडी मिळाली. तर अजित पवार गटाचा पाच पैकी एकच उमेदवार विजयी झाले आहेत.

Advertisements

शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहे. तर एक अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now