⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

MahaTransco Recruitment : महाराष्ट्र वीज पारेषण विभागात 3129 जागांवर नवीन मेगाभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये विविध रिक्त पदांवर नवीन मेगाभरती होणार आहे. यातील काही पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तर काही पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 जुलै 2023 असणार आहे.

या भरती अंतर्गत एकूण 3129 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांना भरतीची जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :

कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी) या पदांसाठी ही भरती होईल.

भरतीसाठी पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा, बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051. {कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी}.

वेबसाईट : mahatransco.in
शॉर्ट जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here