---Advertisement---
जळगाव जिल्हा

राज्यातील येणाऱ्या निवडणूका जिंकण्याचा भाजपचा फॉर्मुला ठरला !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । येत्या वर्षभरात राज्यात निवडणुकांचा पाऊस पडणार आहे. ज़िल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका अश्या कित्येक निवडुका येत्याकाळात संपूर्ण राज्यात होणार आहेत. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुका सुद्धा होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष आता निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यातच भाजप सुद्धा आता निवडणुकीला समोरे जाणार असल्याने भाजपने कंबर कसली असून पक्षाचा फॉर्मुला सुद्धा ठरला आहे. (upcoming elections in maharastra)

maharastra bjp madhav pattern jpg webp webp

येत्या काळातील सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन ४८’ तर विधानसभेसाठी ‘२०० प्लस’ मोहीम भाजपा राबवायचे ठरवले आहे. मात्र यांदा भाजप आणि शिवसेने समोर मोठे आव्हान असणार आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि (ठाकरे)शिवसेना असे तीन पक्ष समोर उभे आहेत. अश्यावेळी भाजप ८०च्या दशकातला जुना फॉर्मुला हाती घेणार आहे.

---Advertisement---

१९८० च्या दशकापासूनच भाजपने ‘माधव’ फॉर्म्युला स्वीकारला होता. याच धर्तीवर भाजपचे तत्कालीन नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर आणि वंजारी समाजाला एकत्र आणले आणि भाजपाला फायदा मिळवून दिला. मुंडे यांचा भाजपला ठराविक लोकांपुरताच मर्यादित न ठेवता तळागळातल्या अठरा पगड जाती जमातींमध्ये रुजविण्यात मोठा वाटा आहे. (bjp ‘madhav’ formula)

भाजप हा पक्ष त्याच्या सुरुवातीच्या वाटचालीत विशिष्ट जातीपुरता मर्यादित होता. यामुळे वसंतराव भागवत यांनीच ‘माधव’ फॉर्म्युला आणला. त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपला दैदिप्यमान विजय मिळाला होता. महाराष्ट्रा(Maharashtra)तही भाजपनं चांगलं यश मिळवत थेट १२२ जागा मिळवल्या होत्या. यात मुंडेंनी वापरलेल्या ‘माधव’ ने निर्णायक भूमिका बजावली होती. आणि येत्या काळात भाजप निवडणुकीसाठी 80च्या दशकातील आपल्या जुन्याच फॉर्म्युल्याकडे जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप प्रयत्न देखील करत आहे.

नुकतेच अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यानगर असे करण्यात आले. हा भाजपच्या त्याच रणनीतीचा भआग असल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा अश्या सर्व निवडणूक भाजप अशा अगदी तागडीने आणि नेटाने लढते. वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्ते असे सर्वजण १०० टक्के झोडून देत काम करतात. यामुळे आता भाजप माधव फॉर्मुला राज्यात पुन्हा असाच १०० % राबवणार का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---