⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावसह राज्यातील 25 झेडपींचा गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर, असा असेल कार्यक्रम?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले होते. राज्यातील जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर आता या निवडणूक पार पडणार असून राज्य निवडणूक आयोगानं देखील (Maharashtra Election Commision) निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नगर पालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना पूर्ण झालेली असेल. राज्य निवडणूक आयोगाने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या निवडणुका एकाच वेळी घेणं सोपं नाही. त्यामुळे या सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे.

असा असेल कार्यक्रम..
गट आणि गण रचनेचे प्रारूप आयुक्तांकडे पाठवणे : 23 मे
त्या आराखड्यांना आयुक्तांनी मंजुरी देणे : 31 मे
प्रारूप गट गण रचना प्रसिद्धी : 2 जून 2022
प्रारूप रचनेवर आक्षेप : 8 जून 2022
आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे : 22 जून 2022
अंतिम गट गण रचनेची प्रसिद्धी : 27 जून 2022

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यात जळगाव(Jalgaon)सह रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (sindhudurga), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahemadnagar), पुणे (pune), सातारा (satara), सांगली (sangli), सोलापूर (solapur), कोल्हापूर (Kolhapur), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), परभणी (parbhani), हिंगोली (hingoli), बीड (Beed), नांदेड (Nanded), उस्मानाबाद (osmanabad), लातूर (latur), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana), यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), गडचिरोली (Gadchiroli) या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा येत्या काही काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधीच पार पडलेल्या आहेत.