जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२६ । राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असताना जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 31जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण जिल्हा परिषदेतील 20 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा तयारी करावी लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी आणखी वेळ द्यावा, या मागणीसाठीसर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपुढे वाढवलेली नाही, तिथे 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी राज्य निवडणूक आयोगाकडून मागणी करण्यात आली होती.

ही मागणी आता सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टाने अजून पाच दिवस जास्त दिले आहेत. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या जिल्हा परिषदांमध्ये ओलांडली गेलेली नाही, त्या निवडणुका 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाला पुरेसा वेळ मिळणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय.

