पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे; IMD कडून पावसाबाबत मोठा इशारा

सप्टेंबर 27, 2025 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचं, जनावरांचे मोठं नुकसान झाले. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अशातच आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये जारी करण्यात आला. जळगाव जिल्ह्याला देखील आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Rain

बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पुढील दोन-तीन दिवसात राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील चार जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लातूर,धाराशिव, हिंगोली आणि नांदेडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट?

हवामान विभागाने शनिवारी (२७ सप्टेंबर) मराठावाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

28 सप्टेंबर

२८ सप्टेंबर रोजी संपूर्ण रायगड जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (२९ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now