---Advertisement---
महाराष्ट्र विशेष शैक्षणिक

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार

ssc exam cancel
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

ssc exam cancel

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणं महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. 

---Advertisement---

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय घेतल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---