जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । गेल्या काही वर्षात महागाईचे वाढते प्रमाण सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात एक मोठा फटका आहे. या महागाईच्या झळा आता सलून सेवांपर्यंत पोहोचल्या आहेत. येत्या १ जानेवारीपासून केस कापणं आणि दाढी करणं महाग होणार आहे.ही वाढ फक्त शहरात नाही तर ग्रामीण भागातही करण्यात येणार आहे.
२० टक्के दरवाढीचा निर्णय
सलून व्यावसायिकांनी महागाईच्या परिणामामुळे दरवाढ करण्याची मागणी केली होती, ज्याला आता मान्यता मिळाली आहे. सलून असोशिएशनचे मुंबई अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने इंधन दरातही वाढ झाली आहे, ज्याचा फटका सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
विविध भागात वेगवेगळी दरवाढ
महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या सलून व्यवसायिकांच्या दरानुसार ही दरवाढ करण्यात येईल. मात्र, सलून व्यावसायिक २० टक्के वाढ करणार नसून ग्राहकांच्या सोयीसाठी ५ ते १० टक्के दरवाढ करणार आहेत. ही दरवाढ फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरातही लागू होणार आहे.
महागाईचा सामान्य नागरिकांवर परिणाम
गेल्या काही महिन्यात महागाईने सर्व सामान्य नागरिकांना टेंशन दिलेले आहे. खाद्यपदार्थ, इंधन, आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आता सलून सेवांमध्येही दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा दबाव येणार आहे.