जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । राज्याच्या सत्तासंघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आजपर्यंतचा इतिहास आहे कि, एकनाथ शिंदे यांनी आजवर कधीही भाजपवर टीका केली नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी भाजपच्या आमदारांची कामे मंजूर केली. एकनाथ शिंदे आणि भाजपात अलिखित छुपी युती होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
राज्यातील सरकार कोसळले असून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ५२ आमदारांच्या गटाचा विजय झाला आहे. राज्यात भाजपने एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळी राजकीय गणितं बदलली आहे. बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून विधान परिषद निवडणूक आटोपताच बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. एकनाथ शिंदे गटाने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करील मविआ सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली होती.
उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकारमधून बाहेर न पडता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने राज्यभर जल्लोष केला असून सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. भाजप एकनाथ शिंदे गटासोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, जळगावात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. जळगावात गुलाबराव पाटलांवर कधीही गिरीश महाजनांनी टीका केली नाही. शिवसेना हा गटारातल्या बेडकरसारखा पक्ष आहे असंही गिरीश महाजन म्हटले होते पण तरीही गुलाबरावांनी काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. याच्यावरून लक्षात येतं कि भाजपबरोबर जायचा विचार एकनाथ शिंदेचा आजचा विचार नव्हता तो फार आधीपासूनच विचार होता असं एकनाथ खडसे म्हणाले.