⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राजकारण | राज्यात पुन्हा राजकीय भूकंप : अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप : अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या राजकीय भूकंपाला एक वर्ष होत नाही तोच आता राज्यात अजून एक भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar)शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे नमूद केली होती. यातच ते राजभवनावर दाखल झाल्याने अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसली तरी देखील अजित पवार हे आपल्या पी ए सह राजभवनामध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.  अशावेळी ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त हाती येत आहे.. अनिल भाईदास पाटील यांच्यासोबत छगन भुजबळ , आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे व दिलीप वळसे पाटील हेदेखील शपथ घेतील असे म्हटले जात आहे.(minister anil bhaidas patil )

author avatar
टीम जळगाव लाईव्ह