⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Maharashtra Police Bharati 2022 : लवकरच राज्यात ७००० पद भरली जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज । Maharashtra Police Bharati 2022 । गेल्या २ वर्षांपासून राखडलेत्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कारण येत्या एकही दिवसात राज्यात पोलीस भरतीसाठी ७००० पद भरली जातील असा अंदाज आहे . पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी कि, गेल्या २ वर्षात कोरोनामुळे पोलीस भरती होऊ शकली नव्हती. मात्र राज्यात लवकरच एक मोठी पोलीस भरती होणार आहे. त्या नंतर अजून १०००० पद राज्य शासन भरणार आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर भरतीत घोटाळा पाहायला मिळाला होता. म्हणून आता पोलीस भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार आहे. अशी माहिती आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीच झाली नव्हती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्षातून एकदा पोलीस भरती ही होत असते. मात्र गेल्या २ वर्षांपासून हि झाली नव्हती आटा ती होणार आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हा दिलासा आहे. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.