जळगाव जिल्हा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे शिक्षक व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथे २७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव ग्रामीण यांच्या वतीने सर्व मराठी शाळांचे शिक्षक व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मान्यवर मनोगत व्यक्त करताना, इंग्रजी ही श्रीमंतांची भाषा व मराठी गरिबांची भाषा असा गैरसमज आहे. म्हणून मराठी भाषा मागे पडत आहे. तसेच नशिराबाद-पालकांना जे अपेक्षित आहे. ते शिकवले तर मराठी शाळा प्रगत होतील व मराठी भाषा अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना व मराठी पत्रकार यांना आज सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

जग एका मुठीत आले आहे, प्रत्येक पालकाला असे वाटते माझा पाल्य खूप शिकून मोठा व्हावा, त्याने जगभरात जावे या करिता त्याला इंग्रजी यावे अशी ईच्छा असते. त्यामुळे त्यांचा कल इंग्रजी शाळेकडे असतो. जर मराठी शाळेत चांगले इंग्रजी शिकवले तर मराठी शाळा अधिक समृद्ध होतील असेही त्यांनी विचार मांडले. झालेल्या सत्कार व गौरविण्यात आल्यामुळे मराठी शिक्षक व पत्रकारांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष व आयोजक मुकुंदा रोटे त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. आमचा कोणी आतापर्यंत गौरव केला नाही. तो आपण केला म्हणून त्याचे आभार मानले. प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी आशा निशिकांत नेमाडे, जगदीश चौधरी, मनीषा भंगाळे, सोनाली साळुंखे, जया देशमुख, इरफान तडवी, रेखा खारे, सोनाली कोठावदे, तुषार सोनवणे,केशव पाटील, जयश्री कुलकर्णी, नीता कापडणे, प्रमोद केळकर, अरुणा नेहेते, किशोर नरवाडे, वंदना लोखंडे,या शिक्षकांचा तर IBN लोकमतचे रिपोटर नितीन नांदूरकर, देशोत्तींचे उपसंपादक सुनील भावसार, लोकमतचे प्रसाद धर्माधिकारी, सकाळचे रमेश शर्मा, लोकसत्ता’चे सुनिल महाजन क्राईम रिपोर्टर चंदन पाटील या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमसाठी नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, लक्ष्मण तायडे, समाधान केदार, संजय कोळी, तेजस कोळी आदि सहकार्य केले.

Related Articles

Back to top button