---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र वाणिज्य

लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांना मिळणार नाही पैसे; कारण काय? घ्या जाणून..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याचे ७५०० हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यात महायुतीला बहुमत मिळाले असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. दरम्यान

ladki bahin 2

दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे. परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

---Advertisement---

मिडिया रिपोर्टनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या काळात काही महिलांच्या अर्जाची छाणणी बाकी होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाणणी पुन्हा सुरु केली जाणार आहे.यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील. त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही, असं सांगण्यात येणार आहे.

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे
ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, अशा महिलांनादेखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही.
ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे, अशा महिलादेखील या योजनेसाठी पात्र नाहीत.
ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---