⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | महाराष्ट्र | Big Breaking : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक

Big Breaking : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । गेल्या अनेक दिवसापासून राज्यात मशिदीवरील लाऊडस्पीकर हटविण्यावरून राजकारण पेटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल रविवारी औरंगाबाद सभा पार पडली असून या सभेत त्यांनी पुन्हा भोंग्यावरून ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर ठाकरे सरकार सक्रिय झाले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse-Patil) आज रात्री महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊ शकतात. राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त कसा आहे, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी मान्य न झाल्यास ४ मे रोजी उत्तर देऊ, असे राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते.

एका वृत्त वाहिनीशी संवाध साधताना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, राज ठाकरेंना अटींसह सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र यावेळी कोणत्या अटींचा भंग झाला आहे, याची चौकशी औरंगाबादचे पोलीस आयुक्त करत आहेत. ते आपला अहवाल महासंचालकांना पाठवतील. समाजात फूट पाडणाऱ्यांनी दिलेले वक्तव्य योग्य नसून त्याचा अहवाल आल्यानंतरच कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, हनुमान चाळीचे पठण करण्यास कोणतेही बंधन नाही. लोक त्यांच्या घरी करतात. मात्र मशिदीसमोर जाऊन कोणत्याही समाजाला भिडण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही.

ते पुढे म्हणाले की, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्पष्ट होते की, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास कायद्याने परवानगी दिली आहे. कायद्याची परवानगी घेऊन कोणी त्याचा वापर करत असेल, तर त्याला कोणी रोखू शकत नाही. त्यानंतर परवानगी नाही. पाटील म्हणाले की, मुस्लिम लोकांविरोधात कोणी लाऊडस्पीकर वापरत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.