जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) पगारासंबंधित एक प्रमुख निर्णय समाविष्ट आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पगार (MUMBAI DISTRICT CENTRAL BANK)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून दिले जाणार आहेत. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामध्ये वित्त विभागाने मुंबई बँकेत वैयक्तिक खाती उघडण्यास मान्यता दिली आहे.
तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम , महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीकरीता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर असून ते भाजपचे नेते आहेत. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की ज्या जिल्हा बँकांना सलग अ वर्ग आहे, त्यांना शासनाच्या व्यवहारांना परवानगी असते. मुंबई जिल्हा बँक या निकषात बसत असल्यामुळे आणि अनेक सरकारी योजनांना आणि उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली आहे. दरम्यान या निर्णयावर विरोधक जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.