महाराष्ट्र शासनाकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर ; वाचा सुट्ट्यांच्या संपूर्ण यादी

डिसेंबर 10, 2025 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२५ । तुम्हीही शासकीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. त्यानुसार २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहे.

holidays 2026

यात भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

Advertisements

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिन : सोमवार, 26 जानेवारी 2026
महाशिवरात्री: रविवार, 15 फेब्रुवारी 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती: गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026
होळी (दुसरा दिवस) : मंगळवार, 3 मार्च 2026
गुढी पाडवा: गुरूवार, 19 मार्च 2026
रमझान ईद (ईद-उल-फित्र): शनिवार, 21 मार्च 2026
रामनवमी- गुरूवार, 26 मार्च 2026
महावीर जन्म कल्याणक: मंगळवार, ३१ मार्च 2026
गुड फ्रायडे: शुक्रवार, 3 एप्रिल 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: मंगळवार, 14 एप्रिल 2026
महाराष्ट्र दिन: शुक्रवार, 1 मे 2026
बुद्ध पोर्णिमा: शुक्रवार, 1 मे 2026
बकरी ईद (ईद-उल-झुआ): गुरूवार, 28 मे 2026
मोहरम : शुक्रवार, 26 जून 2026
स्वातंत्र्य दिन: शनिवार, 15 ऑगस्ट 2026
पारशी नववर्ष दिन: शनिवार, 15 ऑगस्ट 2026
ईद-ए-मिलाद: बुधवार, 26 ऑगस्ट 2026
गणेश चतुर्थी: सोमवार, 14 सप्टेंबर 2026
महात्मा गांधी जयंती: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026
दसरा: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन): रविवार, 8 नोव्हेंबर 2026
दिवाळी (बलिप्रतिपदा): मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026
भाऊबीज: बुधवार, 11 नोव्हेंबर 2026 (अतिरिक्त सुट्टी)
गुरू नानक जयंती: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026
ख्रिसमस: शुक्रवार, 25 डिसेंबर 2026

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now