जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । भारतीय रेल्वेने दररोज करोडो प्रवाशी यात्रा करतात. मात्र अनेकवेळा तांत्रिक कामे रेल्वे एकतर रद्द केल्या जातात नाहीय मार्गात बदल केला जातो. जर तुम्हीही येत्या सोमवारी २७ फेब्रुवारीला महाराष्ट्र एक्स्प्रेसचे तिकीट करणार असाल तर ही बातमी आधी वाचा..
कारण पुणे विभागात रेल्वेची विविध कामे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे घेतलेल्या ब्लाॅकमुळे गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ फेब्रुवारीला गाेंदिया येथून सुटून केवळ पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी पुढे काेल्हापूरपर्यंत जाणार नाही. तर २८ फेब्रुवारीला ही गाडी कोल्हापूर ऐवजी पुणे येथून सुटेल. सातारा- काेरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक कामे सुरू आहेत.
यामुळे गाडी क्रमांक ११०४० व ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस काेल्हापूर-पुणे-काेल्हापूर स्टेशन दरम्यान रद्द केली आहे. रेल्वे प्रशासनाने कळवल्यानुसार गाडी क्रं.११०४० गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ फेब्रुवारीला गोंदियाहून निघेल. पण, ती थेट कोल्हापूरपर्यंत न जाता पुण्यापर्यंत धावेल, असे कळवण्यात आले.