जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । राज्यात सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात भाजप नेते आणि आमदार देखील सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज काही ना काही वक्तव्य करीत असून त्याला इतरांकडून प्रत्युत्तर देखील मिळत आहे. खा.राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याला जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आ.भोळे यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यावेळी आमदार भोळे म्हणाले कि, संजय राऊत म्हणतात मला एक घटना दाखवा जिथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी हिंदू असल्याची प्रतारणा केली १.सरजिल उस्मानी महाराष्ट्रात येऊन हिंदूंचा अपमान करून जातो तरी ही त्यावर कारवाई नाही? २.पालघर साधूहत्याकांडातील आरोपींना अजून शिक्षा नाही? असे ट्विट केले आहे. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुकतेच झालेल्या शिवसेनेच्या सभेत संजय राऊत म्हणाले होते कि, मला एक घटना दाखवा जिथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी हिंदू असल्याची प्रतारणा केली यावर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.