---Advertisement---
महाराष्ट्र

HSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात.. कुठे पाहता येईल निकाल?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 24 मे 2023 । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. गेली अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांसह पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत असून अखेर निकालाची प्रतिक्षा आज संपुष्टात येणार आहे.

maharashtra hsc result 2023 jpg webp webp

आज गुरुवार दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. खरंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट बोर्ड आज निकाल जाहीर करणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.

---Advertisement---

कुठे पाहता येईल निकाल ?
Maharesult.nic.in
hscresult.mkcl.org

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

असा चेक करता येणार ऑनलाईन निकाल?
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---