जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या बारावी परीक्षा निकाल काहीच दिवसापूर्वी लागला. यांनतर दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. अशातच बोर्डाने अधिकृतपणे दहावीच्या निकालाबाबत घोषणा केली आहे.

उद्या म्हणजेच १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या. त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org