⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

उरले अवघे काही तास..! 10वीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांसह पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज शुक्रवारी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईट ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.

कसा पाहाल निकाल?
सर्वात आधी www.mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.
दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.