⁠ 
शनिवार, जून 22, 2024

महत्वाची बातमी! बोर्डाने यंदा 10वीच्या निकालात केला मोठा बदल, वाचा काय आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागलाय. यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.

दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा कोकणने बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिलीये. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय. मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.

दरम्यान, यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत. जे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप समजून घेणं महत्त्वाचे आहे.

एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले असतील किंवा त्याला वाटत असेल की पुन्हा रिचेकिंगला करायचं असेल तर त्यासाठी देखील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटो कॉपी हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. जवळपास ही 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना प्रति विषय 400 रुपये भरुन फोटो कॉपी घेता येणार आहे. दोन विषयाची फोटो कॉपी घेतली तर आणखी काही विषयाची फोटो कॉपी घेत असेल तर ती परवानगी देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी फोटो कॉपीसाठी एकदाच अर्ज करता येत होता. मात्र आता विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा अर्ज करुन फोटो कॉपी घेण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने सहावेळा सहा विषयाची फोटो कॉपी घेतली किंवा एकदाच घेतली तरीही चालणार आहे. बोर्डाने यावर्षीच्या निकालात हा एक बदल केला आहे. अध्यक्ष राज्य मंडळ शरद गोसावी यांनी दिली महत्त्वाची माहिती.