⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मंगळग्रह मंदिरात २९ पासून महाआरोग्य शिबीर, वाचा कसा मिळवायचा लाभ..

मंगळग्रह मंदिरात २९ पासून महाआरोग्य शिबीर, वाचा कसा मिळवायचा लाभ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । रेड स्वस्तिक सोसायटी व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्यावतीने मोफत व अल्प दरात महाआरोग्य शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे शिबीर होणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात एक्सरे, रक्त तपासणी, इसीजी, डायबिटीस तपासणी, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी, दमा (अस्थमा) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरात अनेक मान्यवर आणि तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.

शासकीय योजनेअंतर्गत व प्रायव्हेट फंडिंग मिळून केला जाणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया
हृदय शास्त्रक्रिया– एन्जोप्लास्टी, बायपास, लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असल्यास शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया– कॅन्सरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया (योजनेअंतर्गत येणाऱ्या), पोटाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया– हायड्रोसील, हर्निया, अपेंडिक्स, पित्ताचे खडे तसेच मुळव्याध व भगंदर, स्त्री रोग शस्त्रक्रिया– नॉर्मल डिलिव्हरी, सिजेरियन शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढणे, अंडाशयाची गाठ काढणे, दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या शस्त्रक्रिया, हाडांच्या विकारावरील शस्त्रक्रिया– सर्व प्रकारचे फ्रॅक्चरचे ऑपरेशन, मणक्याची शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, नेत्र विषयक शस्त्रक्रिया– मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पापण्यांच्या आतील अस्तर पदरवाढ शस्त्रक्रिया, लासुर (डोळ्याला पाझर शस्त्रक्रिया) अंजुर्णी किंवा पापणीवरचा गळू छेद शस्त्रक्रिया,चरबी संबंधीची गाठ व शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा, नाक कान घसा संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया– थायरॉईडचा त्रास व ऑपरेशन, नाकात वाढलेले मांस/ हाड काढणे, नाकाचे वाकडे हाड सरळ करणे, कानाचा पडदा बसविणे, घशात वाढलेले टॉन्सिल्स काढणे, अन्ननलिका श्वसनलिका शस्त्रक्रिया, मूत्राशयाचे किडनी आजार– मूत्राशयाचा मार्ग अंकुचीत होणे, मुतखडा शस्त्रक्रिया

सवलतीच्या व अत्यल्प दरात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया
हृदय शस्त्रक्रिया– पेसमेकर व्हॉल्व सर्जरी, मेंदूचे आजार– मेंदूच्या गाठी (ब्रेन ट्यूमर) मेंदूतील रक्तस्राव, (ब्रेन हॅमरेज) पोटाचे विकार- आतड्यांच्या मोठ्या सर्जरी, कॅन्सर– विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरी, किडनी– किडनी बदलणे, लिव्हर– लिव्हर बदलणे, प्रत्यारोपण– गुडघ्याचे प्रत्यारोपण, सांध्याचे प्रत्यारोपण, जन्मता अपंगत्व म्हणजे पाय वाकडे असलेल्या सर्व शस्त्रक्रिया, जन्मता कुबड असलेल्या शस्त्रक्रिया, लहान मोठ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया

शिबिरामध्ये चष्मा, दम्याचे यंत्र, कर्णयंत्र उपलब्ध केले जाणार आहे. तसेच येथे इन्शुरन्स साठी कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहे. शिबिरासाठी येताना आधार कार्ड रेशन कार्ड आणि जुने मेडिकल रिपोर्ट सोबत असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रेड स्वास्तिक सोसायटीचे सर महाव्यवस्थापक रोशन मराठे, प्रकल्प संचालक डॉक्टर कुणाल चौधरी, मंगल ग्रह मंदिर यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 9730089898, 9503590141

author avatar
टीम जळगाव लाईव्ह