⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

7वी/10वी/पदवी पाससाठी खुशखबर! महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तरुण-तरुणी दिवसरात्र अभ्यास करत आहे. अशा तरुणांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदे भरण्यासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार PWD च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. Maha PWD Recruitment 2023

अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे तब्बल 2109 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Maha PWD Bharti 2023

या पदांसाठी होणार भरती:
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
3) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
5) लघुलेखक (उच्च श्रेणी) 08
6) लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
7) उद्यान पर्यवेक्षक 12
8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09
9) स्वच्छता निरीक्षक 01
10) वरिष्ठ लिपिक 27
11) प्रयोगशाळा सहाय्यक 05
12) वाहन चालक 02
13) स्वच्छक 32
14) शिपाई 41

भरतीसाठी आवश्यक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा :18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा