---Advertisement---
गुन्हे राष्ट्रीय

मोठी दुर्घटना! ट्रकची उभ्या तीन बसेसला धडक ; 15 ठार, 50 जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । मध्य प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडलीय. सिमेंटच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

mp accident 1 jpg webp webp

ही घटना मोहनिया बोगद्याच्या नजीक रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलीय. विशेष म्हणजेच हे सर्व लोक गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी सतना येथे आले होते.

---Advertisement---

तेथून परतत असताना मोहनिया बोगद्याजवळ एका भरधाव वेगात असलेल्या सिमेंट ट्रकची धडक बसल्याने या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हुन अधिक जण जखमी झाले.

यातील ३९ जखमींना रीवा येथील संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सीएम शिवराज सिंह रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर रीवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या जखमींच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, जखमींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ट्रकचे चाक फूटल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ₹ 1000000 च्या आर्थिक मदतीसह, त्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीसाठी पात्र असल्यास, त्याला नोकरी दिली जाईल. गंभीर जखमींना ₹ 200000 आणि मध्यम जखमींना ₹ 100000 ची आर्थिक मदत दिली जाईल. गरज भासल्यास गंभीर जखमींना उपचारासाठी विमानाने नेले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---